ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM : 1 Sep 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM : 1 Sep 2024 : Maharashtra News
पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन, गेट वे ऑफ इंडियावर पवार,उद्धव, नाना पटोलेंची सरकारवर कडाडून टीका..
मध्यप्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला, कर्नाटकात पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले, देवेंद्र फडणवीसांचा सवाल, काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप...
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाहीत, चंद्रकांत खैरैंचं वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न...
संभाजीनगर,दादर,नागपूर,सोलापूरमध्ये भाजपचंही मविआला प्रत्युत्तर आंदोलन,पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला असा बावनकुळेंचा सवाल...
महायुतीचं जागावाटप १० दिवसांत जाहीर करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, १३ छोट्या मित्रपक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला जागा हे महायुतीचं सूत्र
भाजप आणि संघ नेत्यांच्या बैठकांवर बैठका, आज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये दोन स्वतंत्र बैठका, संभाजीनगरच्या बैठकीत फडणवीस आणि रावसाहेब दानवेही सहभागी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram