ABP Majha Headlines : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर आर आबांनी केसाने गळा कापला, असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, अजित पवारांनी आरोप केल्यानंतर आमच्या कुटुंबाला दु:ख झालं, असं रोहित पाटील यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी कोणता सल्ला दिला? याबाबत रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले , आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि त्यापूर्वी 2014 पासून अजित पवार यांच्या नेतृत्वात जोमाने काम केलेलं आहे. त्यांनी तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघात अनेक दौरे केलेले आहेत. असं असताना आबा जाऊन इतके वर्ष झाल्यानंतर असं स्टेटमेंट किंवा मनात असलेली मळमळ बाहेर आल्यामुळे आम्हाला दु:ख झालं. आमच्या सर्व कुटुंबियांना याचं दु:ख झालं. आज सकाळीच माझी आजी मला म्हणाली, त्यांनी तसं नाही करायला पाहिजे होतं. आबा हयात असते तर प्रश्न वेगळा होता. इतकी वर्ष मनमन साठवून ठेऊन बोलणे, हे आमच्या लोकांना रुचलेलं नाही.
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, आबा सिंचन घोटाळ्याबाबत म्हणायचे की ज्या खात्यामध्ये इतका खर्च झालेला नाही. त्यामध्ये इतका खर्च कसा होऊ शकतो? हे प्रसार माध्यमांसमोर आबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या त्या स्टेटमेंटच्या जुन्या क्लिपही उपलब्ध असतील. आबांनी ठरवलं म्हणून चौकशी लागली असं कोणतीही बाब नव्हती. आबांनी गृहमंत्री असताना स्वच्छ कारभार केला, अनेक निर्णय घेतले.