ABP Majha Headlines : 09 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा

खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर...मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल

महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार केल्याबद्दल मोदींचे आभार, शरद पवारांची मिश्कील प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेतला विजय ही तर सुरुवात.

महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण...

महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचेे आमदार संजय शिरसाटांचा दावा...लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईकरेट जास्त असल्याचा दावा.. भाजप नेत्यांचा पलटवार 

विधानसभा स्वबळावर की आघाडीतून लढणार, काँग्रेसमध्ये संभ्रम...
२८८ जागांची तयारी, पटोलेंचा पुनरूच्चार...तर मविआ एकत्रित लढणार, पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा...

नाशिक महायुतीत बेबनाव... शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी...तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या भुजबळांचं स्पष्टीकरण

चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर कोणी नेलं हे जगजाहीर, विशाल आणि विश्वजीत यांची जयंत पाटलांचं नाव न घेता माझा कट्टयावर टीका

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram