ABP Majha Headlines : 09 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना निर्देश..तर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला
विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत
महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण...
अधिवेशनात नीटच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक...नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी...तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी
राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली ठरवू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा.. अतिक्रमण विभागाकडून वसंत गितेंचे संपर्क कार्यालयावर कारवाई..प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कारवाई करत असल्याचा गीतेंचा आरोप
अरविंद केजरीवालांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अटकेत..
गंगानदीची पाणीपातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती.. अनेकांची घरं पाण्यात, तर गाड्याही गेल्या वाहून
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम