ABP Majha Headlines : 09 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप, तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याही याच एनजीओ, शिंदेंचा दावा.

विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. 

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडे राष्ट्रवादीसाठी ८५ ते ९० जागा मागणार, राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांची माहिती.  

ईव्हीएमवरुन टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका, दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमला दोष देणार का?, मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल.

कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश, तडीपार करू म्हणणाऱ्यांनाच कोकणातून तडीपार केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचेे आभार, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे उमेदवाराने माघार घेतल्यामुळे फडणवीसांनी मानले आभार.

राज्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पण आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजप आमदार गणेश नाईक यांचे मोठं वक्तव्य.

वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल, मंगेश पंडिलकर जवळच्या फोनवर मिळाला ईव्हीएम उघडण्याचा ओटीपी

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीवेळी वायकर यांचे मेव्हणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात होते, हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांचा आरोप..

मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणी केंद्रावर अनधिकृतपणे मोबाईल फोन वापरल्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची माहिती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram