ABP Majha Headlines : 09 PM : 09 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पहिल्या तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ, शरद पवारांचा वार, राज्यात मविआला ३० ते ३५ जागा मिळण्याचा पवारांना विश्वास, महायुतीचाही पलटवार
अमोल कीर्तिकरांच्या प्रचार रॅलीत १९९३ च्या बॉम्बस्फोटातला आरोपी इब्राहीम मुसाची हजेरी, राजकीय वादळ, रॅलीत गेलो नव्हतो, मुसाचं एबीपी माझाला स्पष्टीकरण
श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहीलंय मेरा बाप गद्दार, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींची जहरी टीका, आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार लिहा, निरूपमांचा पलटवार,
नसलेला हिंदू दहशतवाद आणण्याचं पाप शरद पवारांचं, भाजप नेते सुनील देवधरांचा आरोप, आपलं नाव गोवण्यासाठी कर्नल पुरोहितांवर दबाव असल्याचा दावा
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालय उद्या निकाल जाहीर करणार, तब्बल ११ वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
एअर इंडिया एक्स्प्रेसने निलंबित केलेले २५ कर्मचारी पुन्हा सेवेत..मुख्य कामगार आयुक्त, युनियनसोबतच्या बैठकीत एअर इंडिया एक्स्प्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत