ABP Majha Headlines : 09 AM : 24 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

डोंबिवलीतील बॉयलर स्फोटात मृतांचा आकडा ११वर, मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डोंबिवलीच्या सागाव परिसरात केमिकलची दुर्गंधी, NDRFकडून शोधकार्य सुरू 
((स्फोटानंतर परिसरात केमिकलची दुर्गंधी))

पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, तर अपघात झाला तेव्हा कारमध्ये असणाऱ्या दोन्ही मित्रींची आज चौकशी करणार 

लग्न करून देत नाहीत म्हणून दोन मुलांनी केली बापाची हत्या, संभाजीनगर शहरातीजवळच्या वडगाव कोल्हाटी जवळची घटना
(('बाबा लगीन'चं भीषण रुप!))

लातूर एपीएमसीमध्ये भाज्यांचे दर दुपटीनं वाढले, उष्मा वाढल्यानं भाज्यांचं मोठं नुकसान 
((लातूरमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले))

सांगली जिल्ह्यातील पलूस आंधळीमध्ये उष्माघातानं १२०० ब्रॉयलर कोंबड्यांचा मृत्यू, मालक सीताराम जाधव यांचं लाखो रुपयांचं नुकसान
((उष्माघातानं १२०० कोंबड्यांचा मृत्यू))

दहावी, बारावीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय अखेर हद्दपार... आता प्रत्येक विषयाचे मूल्यमापन गुणांकन पद्धतीनं होणार.. 

अकरावीचे ऑनलाईन प्रवेश आजपासून सुरु,  प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या

ठाण्याजवळचा घोडबंदर घाट आजपासून दोन आठवडे बंद राहणार, हलक्या वाहनांना मुभा, अवजड वाहनं मात्र अंजूर फाट्यामार्गे वळवणार
((घोडबंदर घाट दोन आठवडे बंद राहणार))

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये १४६वा दीक्षांत समारोह सोहळा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती
((NDAमध्ये १६४वा दीक्षांत सोहळा))

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हटंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, १४ जून रोजी मुंबईत पार पडणार सोहळा
((सराफ, हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram