ABP Majha Headlines : 09 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आज नरेंद्र मोदींचा शपथविधी, संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ
शपथविधीआधी महात्मा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला मोदींकडून अभिवादन तर वॉर मेमोरिअल येेथे शहिदांचं स्मरण
पंतप्रधान मोदींसह ५२ ते ५५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता, तेलगू देसमला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रीपदं, जेडीयूला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद, तर शिवसेना, राष्ट्रवादीला एक एक मंत्रिपदाची शक्यता
राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, मात्र कुथलाही निरोप न आल्याची पटेलांची प्रतिक्रिया
मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला...पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं स्पष्ट
मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे १०५ आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, जरांगेंचा पलटवार...
((मराठा आरक्षणावरून दावे, प्रतिदावे))
मान्सून ११ जूनपर्यंत राज्य व्यापणार, आजपासून मान्सूनचा जोर वाढणार... उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विस्तारणार मान्सून
मुंबई, ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, रविवारपासून मंगळवारपर्यंत गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी
पुणे लोणावळादरम्यान मेगा ब्लॉक, पुणे लोणावळा लोकलसेवेवर परिणाम, तर अप आणि डाऊन दिशेच्या डेक्कन क्विन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द
१० जूनपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार, ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक, कोकणकन्या, वंदेभारत, जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल