ABP Majha Headlines : 09: 00 AM 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती, लोकसभेच्या स्ट्राईकरेटनुसार ठरणार विधानसभेचं जागावाटप
रक्ताचे सँपल बदलणाऱ्या ससूनमधीन दोन डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची कारवाई सुरू, सात दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आदेश, पुरावे तपासून कॉऊन्सिल करणार कारवाई
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांनी केले जप्त...घटकांबळेकडून ५० हजार, तर डॉ. हळनोरकडून अडीच लाख रुपये हस्तगत...
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?, अंजली दमानियांचा सवाल...मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन केला नाही, अजित पवारांंचं उत्तर...
पुणे अपघातानंतर मुंबईतही बार पबची छाडाछडती सुरू, गेल्या तीन दिवसांत मुंबईतल्या ५० पबवर छापे, अल्पनयीन मुलाला मद्य देणाऱ्या एका मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल
परदेशात नोकरीचं आमिष दाखवत मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना दणका, एनआयए आणि राज्य पोलिसांचे ८ राज्यात १५ ठिकाणी छापे, देशभरात 5 जणांना अटक
डोंबिवली एमआयडीसीत सर्व कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू, अमुदान कंपनीतल्या स्फोटानंतर एमआयडीसीला जाग
समृद्धी महामार्गाचा अखेरचा ७६ किलोमीटरचा टप्पा याचवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार, एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती
नागपूर वेधशाळेचा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, नवतपा सुरू झाल्याने ३ जूनपर्यंत काहिली... यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता, देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज
((यंदा धो-धो बरसणार!))
नवी मुंबईत कामोठे, खारघर भागात आज पाणी नाही, मोरबे धरण आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात मान्सूनपूर्व दुरूस्तीच्या कामांमुळे पाणीकपात