ABP Majha Headlines 08 PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 25 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 08 PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 25 July 2024 Marathi News

पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला...विसर्ग ४० हजार क्युसेकवर...पुन्हा पाणी तुंबण्याची लोकांना भीती...

पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, महापुराची स्थिती निर्माण झाल्यानं पुणेकरांचे अतोनात हाल, अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप

पुण्यातल्या एकतानगरमध्ये पुन्हा पाणी साचलं,  एनडीआरएफ जवनांकडून बचावकार्य, बोटीही सज्ज

पुण्यातील जलमय एकता नगरची पालकमंत्री अजित पवारांकडून पाहणी.. नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार, अजित पवारांचं आश्वासन

मुंबई शहर, उपनगरात तुफान बॅटिंग करणाऱ्या पावसाची दुपारनंतर उसंत, मुंबईसह उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघरला २४ तासांचा रेड अलर्ट

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी चार तलाव तुडुंब... मुंबई, ठाणे, भिवंडीतली १० टक्के पाणीकपात मागे...

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका.. उल्हास नदीच्या पातळीत वाढ, सुरक्षेच्या कारणास्तव आज आणि उद्या काही मुंबई-पुणे एक्स्प्रेस रद्द

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram