ABP Majha Headlines : 08 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बदलापूरप्रमाणेच आठ जिल्ह्यात ३ दिवसांत चिमुकलींवर अत्याचाराच्या ११ घटना, दहा वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येनं कोल्हापूरही हादरलं,
बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर कडाडून टीका...आधी बहिणींना सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, केला हल्ला...
लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य...उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा हल्लाबोल...शिक्षा दोन वर्षांनी झाल्याचं समोर...
बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी...एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा...
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून बदालापूर शाळेची झाडाझडती...सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जप्त... तर आरोपी अक्षय शिंदेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
एबीपी माझाच्या बातमीची हायकोर्टाकडूनही दखल, बेपत्ता महिलांच्या मुद्यावर सरकारला नोटीस..५ वर्षात १ लाखाहून अधिक महिला झाल्यात बेपत्ता..
समरजित घाटगे आणि भाजपच्या ब्रेक-अपवर शिक्कामोर्तब, सर्व सोशल मीडिया अॅप्सवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह कायम, किमान भिंतींच्या आड तरी चेहरा जाहीर करा, ठाकरेंची पवार, काँग्रेसकडे मागणी, सूत्रांची माहिती
चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटांत हाणामारी..मनसेकडून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच चंद्रप्रकाश बोरकरांचे समर्थक आक्रमक
विधानसभेच्या रिंगणात स्वत: उतरणार नाही, मनोज जरांगेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीत स्पष्टोक्ती...७०० ते ८०० इच्छुक येऊन गेल्याची माहिती, सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातली...
जालन्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट.. विधानसभेबाबत चर्चा नाही, तब्येतेची विचारपूस करण्यासाठी भेट, चव्हाणांची माहिती
आंदोलनानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली... पण आंदोलनानंतर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची धरपकड
लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हेल्पलाईन नंबर जारी.. योजनेची माहिती देण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचा मदतीचा नंबर
एकनाथ खडसे भाजपमध्ये की अजूनही राष्ट्रवादीतच संभ्रम कायम...२५ ऑगस्टच्या पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यात खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा रंगली...
सेबी, अदानी प्रकरणात ईडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक...मुंबईत ईडी कार्यालयावर धडक मोर्चा...
पेटती काडी पेट्रोल सांडलेल्या जमिनीवर टाकल्याने उडाला आगीचा भडका..आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील घटना.. आगीत अनेक दुकानांची राख