ABP Majha Headlines : 08 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सध्याचं काम सुरुच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शाहांचा सल्ला, मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार..
मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी
नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात लगबग
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमताने अनुमोदन, एनडीएच्या बैठकीत मोदींचं राज्यघटनेला वंदन
आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीशकुमार यांचं आश्वासन
शिवसेनेकडून २, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी, महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला ३ कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा, राजनाथ सिंहांकडे विनंती..अजित पवारांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
लोकसभा निकालांनंतर शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, शिंदेंच्या शिवसेनेतले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती, शिंदे गटाच्या शिरसाटांचा पलटवार
अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा, काँग्रेस नेतृत्वाकडून विशाल पाटलांचा दिल्लीत सत्कार
रामटेकच्या पराभवाचे विलन चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप, बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा
जळगाव जिल्ह्यातल्या तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा दूतावासाशी संपर्क, पालकांना सहकार्य करण्याचं आवाहन
पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून मुंबईसह राज्यात आगेकूच करणार, पुढचे चार आठवडे मुसळधार पावसाचे, आयएमडीचा अलर्ट