ABP Majha Headlines : 08 PM : 04 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमिफायनलमध्ये धडक, पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर ४-२ असा विजय
अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारतानं इंग्रजांना हरवले, निर्धारीत आणि एक्स्ट्रा वेळेत भारतानं १० गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य...
खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग ३६ हजार क्युसेकवर, एकतानगरमधल्या नागरिकांना लष्करामार्फत सुरक्षित स्थळी हलवलं, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची पूरस्थितीवर नजर..
नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीनं पात्र ओलांडलं, नदीकाठची दुकानं हटवली, लोकांना सतर्क राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना..
मुंबईला पाणीपुरवठा करणारं मध्य वैतरणाही तुडुंब भरलं, सात पैकी पाच धरणं १०० टक्के भरली..मोडकसागर आणि अप्पर वैतरणा पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा..
उद्धव ठाकरेंच्या अमित शाहांवरील टीकेनंतर भाजप नेते आक्रमक, नारायण राणे,बावनकुळे,चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर..
अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीत मुलगा रणजीतसिंह उपस्थित..
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य, नारायण राणे, राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला, समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्रं गोळा करण्याची सूचना..
अठ्ठ्याण्णवे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार, सरहद संस्था असेल आयोजक, ७० वर्षानंतर होणार राजधानीत मायमराठीचा जागर..
अकोला जिल्ह्यात डिझेलचा टँकर उलटला, लोकांनी पाणी भरावं तसं डिझेल भरुन नेलं..पोलिसांनी धावत घेऊन लोकांना हटवलं...
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शाहपूर गावात ९ मुलांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी, धार्मिक कार्यक्रमावेळी भिंत कोसळून दुर्घटना.
नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकल्यास ऍटलिस कंपनी देणार एका दिवसाचा व्हिसा मोफत, सीईओ मोहक नाहटांनी जाहीर केली अभूतपूर्व आणि अफलातून ऑफर...
भारतीय मुष्टीयोद्धा निशांत देववर ऑलिंपिकमध्ये अन्याय झाल्याची भावना, पंचांच्या गुण देण्यावर मुष्टीयोद्धा विजेंदरनं उपस्थित केले प्रश्न,सोशल मिडीयावरही गुण बहालीवर टीकेची झोड...