ABP Majha Headlines : 06 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 06 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलीन होतील, इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शरद पवारांचं भाकित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचा दावा

शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत, सरकारचा हल्लाबोल, तर सुप्रिया सुळेंमुळे आजवरचं विलिनीकरण टळलं, संजय निरुपम यांचा आरोप  

राज्यात विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक जाहीर, मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक

औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला मोठा दिलासा, नामांतर विरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली.

अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का, पंतप्रधान मोदींचा सवाल, दक्षिणेत मोदींचा प्रचाराचा धुरळा

भाजपने रेमडेसीवीर बनवणाऱ्या कंपनीकडून निधी घेतला, तर रेमडेसीवीरची परवानगी देताना लाखो कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांचा आरोप.

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, प्रचार करण्याबाबत मात्र भुजबळांकडून ठोस आश्वासन नाहीच

अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पत्नीला सहकार खात्याचा दणका, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द, तर संचालकपद कायम असल्याचा सदावर्तेंचा दावा

ईशान्य भारतातले लोक चिनी नागरिकांसारखे दिसतात, अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, अशी विधानं खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा

एअर इंडियाचे पायलट आणि केबिन क्रू सामूहिक वैद्यकीय रजेवर, ७५हून अधिक उड्डाणं रद्द, विलिनीकरणाच्या भीतीमुळे कर्मचारी बिथरल्याची शक्यता

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram