ABP Majha Headlines : 10 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, मतदानानंतर काही दिवसांनी आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीत मोठी वाढ ही संशयास्पद, राऊतांचं वक्तव्य.

अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, पवारांच्या मुलाखतीनं चर्चांना उधाण, तर पवारांना पक्ष चालवणं जमत नसल्याची महायुतीची टीका

मला बाप बदलण्याची गरज नाही, माझ्या बापाच्या नावावर तुम्ही मते मागता, मावळमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

महायुतीच्या उमेदवारांसाठी १५ मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा.. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार, मनसे नेते बाळा नांदगावकरांची माहिती

अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता, शिखर बँक घोटळ्याची चौकशी एसआयटीद्वारे करा, मुंबई हायकोर्टात याचिका

संभाजीनगर आणि धाराशीव नावावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब, सरकारकडून निर्णयाचं स्वागत, तर निवडणुकांदरम्यान निकाल का? याचिकाकर्त्यांचा प्रश्न

अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का, तेलंगणातल्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल, तर टेम्पोतून पैसे घेण्याचा वैयक्तिक अनुभव आहे का, राहुल गांधींचा प्रतिसवाल

भाजपने रेमडेसीवीर बनवणाऱ्या कंपनीकडून निधी घेतला, तर रेमडेसीवीरची परवानगी देताना लाखो कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांचा आरोप.

भारतीयांच्या वर्णावरून केलेल्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर वादाला उधाण, वर्णावरून विधानं खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदींची टीका, पित्रोदांचा अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram