ABP Majha Headlines : 08 AM : 18 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 08 AM : 18 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित
निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर, भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती
राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी.. शरद पवारांचे फोटो वापरण्यात अजित पवार गटाला मनाई, कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष
अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात....शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका. शेत करायला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला..
उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर, मतदारसंघात पाच सभा होणार, ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
महाविकास आघाडीकडे जागावाटपाचे दोन फॉर्म्युले, वंचितशिवाय २२-१६-१० तर वंचितसह २०-१५-९-४ असा फॉर्म्युला, हातकणंगल्यात राजू शेट्टींना बाहेरुन पाठिंबा
मविआ दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार, आज मविआची बैठक होण्याची शक्यता, तर महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता
विजय शिवतारे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता