ABP Majha Headlines : 08.00 AM : 24 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

डोंबिवली एमआयडीसीतील आग विझली, नऊ जणांचा मृत्यू, बेपत्ता कामगारांचा शोध सुरु, मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, तर अपघात झाला तेव्हा कारमध्ये असणाऱ्या दोन्ही मित्रींची आज चौकशी करणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.

दहावी, बारावीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय अखेर हद्दपार... आता प्रत्येक विषयाचे मूल्यमापन गुणांकन पद्धतीनं होणार.. 

अकरावीचे ऑनलाईन प्रवेश आजपासून सुरु,  प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या

ठाण्याजवळचा घोडबंदर घाट आजपासून दोन आठवडे बंद राहणार, हलक्या वाहनांना मुभा, अवजड वाहनं मात्र अंजूर फाट्यामार्गे वळवणार
((घोडबंदर घाट दोन आठवडे बंद राहणार))

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पार पडतोय १४६वा दीक्षांत समारोह सोहळा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती
((NDAमध्ये १६४वा दीक्षांत सोहळा))

आयपीएलच्या दुसऱ्या प्ले ऑफ सामन्यात आज राजस्थान रॉयल्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे तगडे आव्हान, दोन्ही संघासाठी 'करो या मरो'ची स्थिती, जिंकणारा संघ फायनल खेळणार.

डोंबिवली काल झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झालाय. अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या केजी केमिकल्सच्या आवारातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.. दरम्यान काल दुपारी डोंबिवली एमआयडीसी फेज २ सागाव भागात  केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. काल दुपारी दीडच्या सुमाराला अमुदान केमिकल्स या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 60 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram