ABP Majha Headlines : 07 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला 

मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार

विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट

मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली


मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा

राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं 

झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले 

काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद...

काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद...

राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला

बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष 

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश

भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram