ABP Majha Headlines : 07 PM : 10 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर
अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याची टीका करणाऱ्या पुतण्याचा शरद पवारांकडून समाचार
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी 11 वर्षांनी निकाल, दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष
दाभोलकर हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड अजून मोकाट, मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार
माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो, पारनेरमधील सभेतून अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल, ,
पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्ये पावसाची हजेरी, पारनेरमध्ये पावसात अजित पवारांची सभा, जालन्यातील मविआची सभा रद्द, तर पुण्यात राज ठाकरेंच्या सभेवर पावसाचं सावट
अजित पवार गटातील नरहरी झिरवळ मविआच्या बैठकीसाठी उपस्थित, दिंडोरीचे मविआचे उमेदवार भास्कर भगरेंच्या शेजारी स्थान, चर्चांना उधाण
काँग्रेस आणि एमआयएमवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा, तर राणा आणि ओवेसींवर कारवाईची बच्च कडूंची मागणी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, १ जूनपर्यंत करता येणार प्रचार, २ जूनला पुन्हा शरण येण्याचे आदेश
सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने पाकचा आदर करावा, मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य