ABP Majha Headlines : 07 PM : 02 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य, आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज
देशमुख आणि फडणवीस नागपुरात एकाच व्यासपीठावर, पण संवादच नाही, बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद...
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम..
महाराष्ट्र एटीएसकडून अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा भांडाफोड, दीड वर्षांपासून सुरु होतं रॅकेट...एकाला अटक, १० सिम बॉक्स, २६५ सिम कार्ड जप्त...
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली, भरतीला आलेल्या उमेदवारांंचा आरोप, अडीच हजार उमेदवारांना नाहक त्रास, अंबादास दानवेंचीही टीका
लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिल्या हफ्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी
SC आणि ST च्या आरक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार, निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असल्याचा दावा..
सुजय विखे मोठ्याचं लाडकं लेकरु, संगमनेर आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणी उभा करा, बाळासाहेब थोरातांनी घेतली सुजय विखेंची फिरकी, पक्षानं नाही तर पालकांनी छंद पुरवावा असा सल्ला...
हर्षवर्धन पाटीलन विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना
((हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?))
मनसे कार्यकर्ते जय मालोकार राष्ट्रवादीमध्ये येणार होते म्हणून त्यांच्याबाबत अघटित घडलं, अमोल मिटकरींनी व्यक्त केला संशय, मालोकारांच्या मृत्युला कर्नबाळाच जबाबदार असा आरोप..
मनसेनं कारण नसताना वाद वाढवला, मिटकरींच्या प्रकरणात अजितदादांची पहिलीच प्रतिक्रिया, वाचाळवीरांची संख्या वाढलीय अशीही टीका..
शिर्डीत भाजप नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर, बाळासाहेब थोरातांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं आश्चर्य, पिपाडांनी २००९ ला लढवली होती विधानसभा निवडणूक..
मनोज जरांगेंविरुद्धचं अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द, कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज..
कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग खाली असलेल्या वाहनांवर कोसळलं, २ ते ३ जण जखमी, तर ८ ते १० जण थोडक्यात बचावले
कोल्हापूरच्या अकिवाट- बस्तवाडदरम्यान पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, सहा शेतकरी गेले वाहून, तिघं बचावले, एकाचा मृत्यू, दोघं अद्याप बेपत्ता..
इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांंचा हैदोस, कॉलेज विद्यार्थ्यावर पाच भटक्या कुत्र्यांंचा जीवघेणा हल्ला, प्रसंगावधान राखून उडी मारल्यानं वाचला..
Continues below advertisement