ABP Majha Headlines 07 AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM AM 23 July 2024 Marathi News

Continues below advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार..नोकरदार वर्गापासून बड्या उद्योजकांचं बजेटकडे लक्ष

सकाळी ११ वाजता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार..अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडे राज्याचं लक्ष 

आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष 

राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निकालाकडे दोन्ही गटातील आमदारांचं लक्ष 

देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर, तर आज संघासोबत खलबतं 

आरक्षण प्रश्नी पवारांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची तासभर खलबतं, तर जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिलाय? पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

कोकण आणि विदर्भाला आज पावसाचा अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. 

पूजा खेडकरांनी आई-वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवत नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवल्याचा संशय, घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram