ABP Majha Headlines 07AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 16 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश
विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई, खासदार शाहू महाराज आज करणार विशाळगडाची पाहणी
विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्व २८८ जागांचा सर्व्हे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...
आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकही उमेदवार असतील, अजिदादांचं स्पष्टीकरण...जागावाटपात २०१९ राष्ट्रवादीनं जिंकलेल्या ५४ जागांवरही अजितदादा दावा करणार...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात निलंबित तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी फेटाळले आरोप.. होर्डिंग दुर्घटना आपल्या कार्यकाळात घडली नसल्याचा जबाब..
तिहार जेलमध्ये मुक्कामी असलेल्या अरविंद केजरीवालांचं वजन साडे आठ किलोंनी घटलं, आपचा दावा...घरातून जेवण, मग वजन कसं घटलं, भाजपकडून चौकशीची मागणी...