ABP Majha Headlines : 07 AM : 04 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल...तुमच्या खासदाराचा निकाल सर्वप्रथम एबीपी माझावर... निकालाचं सर्वात अचूक आणि वेगवान कव्हरेज...
भाजपचं चार सौ पारचं स्वप्न खरं ठरणार की इंडिया आघाडी ब्रेक लावणार...काही तासांत कळणार कुणाची ताकद किती...
निकालाआधी उमेदवारांचं देवदर्शन.... सगळ्याच उमेदवारांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार का, एक्झिट पोलनंतर सगळ्या देशाचं लक्ष...ब्रँड मोदीचा प्रभाव किती, आज होणार फैसला...
एक्झिट पोलनुसार भाजप दक्षिण भारतात मुंसडी मारणार का, होणार निकालात स्पष्ट...आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळच्या निकालाकडे लक्ष...
महाराष्ट्रात महायुती की महाआघाडी, कुणाला मिळणार कौल...सहानुभूतीची लाट चालणार की फोडाफोडीची राजकारणावर होणार शिक्कामोर्तब...उत्सुकता शिगेला....
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाईत काका भारी पडणार की पुतण्या?, नणंद-भावजयीच्या लढाईत कोण जिंकणार, काही तासांत लागणार निकाल...
निकालाआधीच पंकजा मुंडे आणि मुनगंटीवारांच्या सावध वक्तव्यानं चर्चांना उधाण...चंद्रपूर आणि बीडमधल्या निकालाची उत्सुकता...निकालाआधीच पंकजा मुंडे आणि मुनगंटीवारांच्या सावध वक्तव्यानं चर्चांना उधाण...चंद्रपूर आणि बीडमधल्या निकालाची उत्सुकता...