ABP Majha Headlines : 07.00 AM : 03 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 07.00 AM : 03 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
भिवंडीच्या शांतीनगर भागात दोन गटांमध्ये जोरदार राडा, चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, खबरदारी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
हिंगोलीचे शिवसेना नेते हेमंत पाटील यांचं वर्षा बंगल्यावर जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष
पुण्यात वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी, तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा, नांदेड,परभणी, संभाजीनगरचेही उमेदवार जाहीर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या ५ जागांच्या उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार
काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा..तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर
उन्मेश पाटील आज दुपारी १२ वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, जळगावमधून भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेश पाटील नाराज
राहुल गांधी आज शक्तिप्रदर्शन करत वायनाडमधून अर्ज भरणार, प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार, मनमोहनसिंग मध्यमवर्ग आणि महत्वकांक्षी तरूणांचे हिरो, मल्लिकार्जून खर्गेंकडून पत्र लिहित भावना व्यक्त.