ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 06 PM : 30 August 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजितदादा आणि शिंदेंनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही माफीनामा...शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींचं जाहीर वक्तव्य...

पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही, मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया...माफीला उशीर झाल्याची टीका... 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन..२०१९मधील सरकारनं या बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी काँग्रेस नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख यांच्यावर ठेवला पहारा...

बंदराच्या रिक्लेमेन्शनसारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमन्शन करावं, मुंबईतील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊतांनीही दिली राजकोट किल्ल्याला भेट, महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याची ग्वाही...तर पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप...

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई ...

'राष्ट्रवादीसोबत असल्यानं उलटी येते', तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीत घमासान, तानाजी सावंतांना विचारुन महायुतीत सहभागी झालो नाही, सुनील तटकरेंचा पलटवार

इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल, भाजपनं आपल्या अनुभवाचा उपयोग करुन घेतला नसल्याची व्यक्त केली खदखद...

केंद्राच्या झेडप्लस सुरक्षेसंदर्भात काही बाबी शरद पवारांनी नाकारल्या, सुत्रांची माहिती, तर स्वतःच्या अटी ठेवून सुरक्षा घेण्याची शरद पवारांची तयारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram