ABP Majha Headlines : 06 PM : 21 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 06 PM : 21 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही उपस्थित

लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केलं, जरांगेंचा आरोप.. तर नोंदी रद्द करणार नाही आश्वासन द्या, जरांगेंची मागणी

माझ्यासमोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर घणाघात.. तर जरांगेंना आरक्षणातलं काहीही कळत नसल्याचीही केली टीका..

भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, मनोज जरांगेंचा इशारा, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण?, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल 

विरोधात गेलेल्या ९ मंत्र्यांना पाडणार...मनोज जरांगेंचा थेट इशारा... तर सरकारने दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभ केल्याचा जरांगेचा आरोप

जालन्यात अज्ञातांकडून एसटीवर दगडफेक, वडीगोद्री गावाजवळ शिवाजीनगर भागातील घटना

लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या... मात्र मविआमधील एकीसाठी दोन पावलं मागे घेतली... पुण्यातील बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram