ABP Majha Headlines : 06 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक...मसुरीला परत बोलावलं...एबीपी माझाच्या बातमीनंतर पूजा खेडकरांना मोठा दणका...
दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती...तर खेडकरांनी जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, बच्चू कडूंची मागणी...
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर, कोर्टाच्या परवानगीशिवाय बंद खोलीत मिहीर आणि नातेवाईकांची भेट...
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी विशाळगडावर गोंधळ झालेल्या ठिकाणाची केली पाहणी...आधी पोलिसांनी विरोध केल्यानं काही काळ बाचाबाची...
विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी अफजल खानाची भूमी नाही, मंगलप्रभात लोढांचा इशारा
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यावरून पेटला वाद, साधू महतांची अविमुक्तेश्वरानंदांवर टीका, उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाला धोका दिल्याचा आरोप
सुनेत्रा पवार अजिदादांच्या बहीण नीता पाटलांना भेटायला मोदीबागेत गेल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण...सुनेत्रा पवार मोदीबागेत गेल्यानं चर्चांना आलं होतं उधाण.