ABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोदी शाहांवर हल्लाबोल, तर ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, बावनकुळेंची टीका
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा 
महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदेंत्या प्रचारासाठी खारेगावात राज ठाकरेंची सभा
उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांची माझ्याबद्दलची नाराजी दूर, एकनाथ खडसेंचं वक्तव्य, यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही केलं स्पष्ट 
मराठ्यांची भीती वाटते, म्हणून बीडमध्ये मोदींनीही सभा घेतली, मनोज जरांगेंची भाजपवर टीका, तर 
कुणाला पाडा हे सांगितलं नाही, पण मराठे पाडापाडी करणार, जरांगेंचा इशारा
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी उद्या ११ जागांसाठी मतदान, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, खडसे, यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला 
राहुल गांधींच्या वयापेक्षाही कमी जागा काँग्रेसला मिळणार, पश्चिम बंगालमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात
मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ताब्यात, संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू भागातली घटना
छोटा हाती टेम्पो उलटल्यावर सात कोटी रुपयांची रोक़ड रस्त्यावर पडली, आंध्र प्रदेशच्या नल्लाजर्ला भागातली घटना
राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, तर राजकीय सभांनाही फटका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram