ABP Majha Headlines : 06 PM : 07 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचार जून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट..गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न, नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य..काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळं शहीदांचा अपमान झाला, विजय वडेट्टीवांच्या वक्तव्यावरुन मोदींचा निशाणा
मतदानाआधी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ रोहित पवारांकडून ट्वीट...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप, निवडणूक आयोग, पोलिसांनी चौकशी करावी, अजितदादांचा पलटवार
बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट, तर भेटीबाबत माहिती नाही, आमची भेट झाली नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया
सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम मशिन पेटवण्याचा प्रयत्न..मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं
धाराशिव मतदारसंघातील पाटसांगवीत मतदान केंद्राजवळ हत्या झाल्यानं खळबळ, दोन गटात राडा झाल्यावर चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्य़ांमध्ये राडा, सातपुते मतदारांवर प्रभाव पाडत असल्याचा काँग्रेसचा आरोप