ABP Majha Headlines : 06 PM : 05 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमबीर सिंहांनी १०० कोटींचा आरोप केल्याचा अनिल देशमुखांचा दावा, तर झूठ बोले कौआ काँटे म्हणत फडणवीसांचा पलटवार
फडणवीसांसोबत डील केल्याच्या आरोपांचं परमबीरसिंहांकडून खंडन, संजय पाडे आणि देशमुखांची डील झाल्याचा दावा, एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया, केस मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडल्याचाही दावा.
आपण नार्को टेस्टसाठी तयार अनिल देशमुखांचीही नार्को टेस्ट करा, एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत परमबीर सिंहांचं आव्हान, देशमुखांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला.
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही... राज ठाकरेंकडून पुनरुउच्चार... .तर राज्यात माणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी... राज ठाकरेंचं वक्तव्य
राज ठाकरेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी, परप्रांतीयांबाबतचं राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगणारं असल्याचा दावा
भाजपच्या समरजीत घाटगेंना शरद पवार गटानं संपर्क साधल्याची माहिती, कागलमधून हसन मुश्रीफांविरुद्ध समरजीत घाटगेंची चाचपणी सुरु असल्याची माहिती...
लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं. सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार.
आगामी विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवार जाहीर, शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी
पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात, सांगवीतील पूरग्रस्तांशी शिंदेंचा संवाद
दोन वर्षानंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम, दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत गेलं पाणी, नदीकाठच्या लोकांना सतर्क राहा अशा सूचना...
मालेगावातील गिरणा नदीत अडकलेल्या मच्छिमारांची १५ तासांनंतर सुखरुप सुटका, लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य
सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण १०० टक्के भरलं, धरणातून ८० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना..
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत, मलेशियाच्या ली झी जियाशी होणार सामना
अमेरिकेतल्या मंदीच्या भीतीनं जगभरातल्या शेअर बाजारात पडझड, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अडीच हजार अंकांनी पडला, जपान आणि कोरियामध्येही लावावे लागले सर्किट...
श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार, राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी