ABP Majha Headlines : 05 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचेे आमदार संजय शिरसाटांचा दावा...लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईकरेट जास्त असल्याचा दावा.. भाजप नेत्यांचा पलटवार 

नाशिक महायुतीत बेबनाव... शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी...तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या भुजबळांचं स्पष्टीकरण

विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरूच्चार...तर महाविकास आघाडी एकत्रित लढणार, पत्रकार परिषदेत ठाकरे, पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा..

महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण...

देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या नॅरेटिव्हच्या आरोेपांना उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल 

सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा....सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबत शंभूराजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार अहवाल...


ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाहीच... ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम...

पुण्यात जामिनावर सुटलेल्या ३ आरोपींचा हैदोस. दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला,.. एकाचा मृत्यू, दोन आरोपी अल्पवयीन

उत्तराखंडमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो अलकनंदा नदीत कोसळला, अपघातात १० जणांचा मृत्यू, बद्रीनाथ महामार्गावरील घटना

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram