ABP Majha Headlines : 05 PM : 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, रात्री ८ वाजता मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी, कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, जॉईंटमध्ये गळती, पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंची टीम ससूनमध्ये, तर चौकशी करणारे किती स्वच्छ? अंबादास दानवेंचा सवाल
दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना...तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्याने पद मिळाल्याचा आरोप...
पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
सुप्रिया सुळेंवर सोनिया दुहान यांचा हल्लाबोल, सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्वगुण नाहीत, सुप्रिया सुळेंच्या जवळच्या काही लोकांमुळे पक्ष सोडत असल्याची टीका
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं, मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता