ABP Majha Headlines : 05 PM : 16 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय
अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण
विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार
कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप
सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण
धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं...
बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी...
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप
स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ