ABP Majha Headlines : 04 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 04 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबईच्या नरीमन पॉईंट परिसरात मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीजपुरवठा सव्वा तासानंतर सुरळीत, बेस्टच्या तांत्रिक कामामुळं मंत्री महोदयांना एसी आणि लाईटविना बसण्याची वेळ

मुंबई शिक्षक मतदारसं निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोेरनारेंनी घेतले दोन उमेदवारी अर्ज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर

मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींचा एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मराठ्यांना ओबीसी कोट्याटून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा

विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी, तर ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अगरवालचा ताबा पुणे पोलीस घेऊ शकतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram