ABP Majha Headlines : 04 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक...नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी...तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी
राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली
ठरवू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
वायकरांचा मेहुणेा मंगेश पंडीलकरकडं होतं अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंटचं आयडी कार्ड, पंडीलकरनं दोन उमेदवारांचं ओळखपत्र वापरल्याचा शाह यांचा आरोप....
(पंडीलकरकडं दोन-दोन ओळखपत्रे-शहा)
उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं,
वृत्त खोडसाळपणाचं असल्याचा दावा
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी.. कथित ऑडिओ क्लिपनंतर वादात सापडलेल्या खांडेंवर कारवाई..
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय टीम लातूरमध्ये दाखल होण्याची शक्यता.... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर
पुण्यातील वानवडीत टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत
काही मुलं आणि महिला जखमी,तर मुलाच्या वडिलांना अटक.
लडाखमध्ये लष्कराचा रणगाडा नदीत कोसळला. दुर्घटनेत पाच जवान शहीद. नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान अपघात झाल्याची माहिती.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, त्याआधी मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं माऊलींच्या पादुकांचं दर्शन.. तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांत आज अंतिम सामना,भारतीय वेळेनुसार आज रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार.