ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha 
वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते, बदनाम करण्यासाठी आपल्यावर आरोप, बीडमधील देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मुंडेंची मागणी
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बुर्गे बीडहून केजला रवाना, सीआयडीचे अपर महानिरीक्षक सचिन पाटीलही बीडमध्येच 
कल्याण अपहरण-हत्या प्रकरणातील नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला ७ दिवसांची पोलीस कोठडी, जलदगती न्यायालयात खटला चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर, २ जण चौकशीसाठी ताब्यात, गटबाजीतून हत्येचा कट रचल्याची माहिती
राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचे मृतदेह पिंपात आढळल्यानं खळबळ, शेजारी राहणाऱ्या आचाऱ्याकडून अतिप्रसंग करुन हत्या, फाशीच्या शिक्षेची मागणी करत नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
श्रीनगरला सुट्टीवर जाण्यापूर्वी शिंदे कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला, मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा, अमित शाह आणि जेपी नड्डा यांचीही घेतली भेट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola