ABP Majha Headlines : 04 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

काँग्रेससमोर नकली शिवसेनेने गुडघे टेकलेत.. नकली शिवसेनावाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचतायत, नाशिकमधील सभेतून पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिकमध्ये मोदींच्या भाषणादरम्यान कांद्यावर बोला अशा तरुणाच्या घोषणा..तर आमच्या काळात ३५ टक्के कांदा निर्यात वाढली, मोदींचा दावा

पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग  दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी ६ पासून घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद राहणार.. सुरक्षेच्या कारणास्तव जागृतीनगर ते वर्सोवा मेट्रो सेवा सुरु राहणार

मुंबईतील मतं आकर्षित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडू तीन मंत्र्यांवर, शंभूराज देेसाई, उदय सामंत आणि दीपक केसरकरांना तातडीनं कामाला लागण्याचे आदेश

घाटकोपरमधील अपघातग्रस्त पेट्रोलपंपही अनधिकृत असल्याची बाब उजेडात, महसूल खातं, पोलीस गृह मंडळानं नाकारली होती परवानगी 

ब्लेम गेम न करता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी ठाकरेंनी स्वीकारावी, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, मोदींच्या रोड शोआधी दोषींवर कारवाई होणार का? सरकारला सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram