ABP Majha Headlines : 04 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णायवर बैठकीत चर्चेची शक्यता
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमताने अनुमोदन, राज्यघटनेला वंदन करत पंतप्रधान मोदींचं इंडिया आघाडीला कृतीतून उत्तर.
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख, थोर नेत्यांच्या परंपरेत बाळासाहेब असल्याचं नमूद
एनडीए हा भारताचा आत्मा, पुढील १० वर्षे देशात एनडीए सरकार, पंतप्रधान मोदींचा विश्वास, तर ईव्हीएमवरुन विरोधकांनाही चिमटे, काँग्रेसला टोले
शिवसेना भाजप फेविकॉलचा जोड, तुटणार नाही, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला मुख्यमंत्री शिंदेंचं अनुमोदन, अजित पवार यांच्याकडूनही समर्थन
नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, भाजप नेते प्रल्हाद जोशी यांची संसदीय पक्षाच्या बैठकीत घोषणा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय.. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिंदे गटाला मोठा हादरा असेल असं सांगितलं जातंय. शिंदेंचे ५ ते ६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिलीय. पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध किंवा विरोधात कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.