ABP Majha Headlines : 03 PM : 21 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ओबीसी आंदोलनकर्त्यांच शिष्टमंडळ काही वेळापूर्वी मुंबईला रवाना झालं आहे.. संभाजीनगर विमानतळावरून विशेष विमानानं हे शिष्टमंडळ मुंबईकडे निघालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर त्यांची बैठक होणार आहे.
पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, राज्य़ातल्या वरिष्ठ नेतृत्वाने पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केल्याची माहिती.
'विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने एक आदिवासी उमेदवार द्यावा, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी.
राज्यातील एमपीएससी आणि वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा घेण्याकरता परीक्षा आयोग नेमा, आमदार अभिजीत वंजारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
अकरावी कोट्यातील रिक्त जागांवर उद्यापासून प्रवेश, २७ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार, तर विद्यार्थांना १ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार.
गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कणकवली, वैभववाडीत अतिवृष्टी, यात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक २१५ मी.मी पावसाची नोंद.
सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील आरे गावाला वादळी पावसाचा तडाखा, अनेक घरांची पडझड तर काही घरांचं छप्पर उडून गेल्याची माहिती.
मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा प्रवाहित, सर्वत्र दाट धुक्याची चादर .
सिंधुदुर्गच्या कणकवलीतील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित, यासह आंबोली, नापणे, मांगेली, न्हावनकोंड हे धबधबेसुद्धा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात.
रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसामुळं जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, चिपळूणमध्ये देखील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ.
चिपळूण-गुहागर महामार्गाला मीरजोळी जवळ नदीचं स्वरुप, गटारे नसल्याने डोंगरातील पाणी थेट रस्त्यावर, अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना वाहनटालकांची कसरत.
कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द, सध्या रोहा ते वीर असे दुहेरीकरणाचे काम पूर्ण, आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरणाचे काम केलं जाणार.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला.
मुसळधार पावसामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मातीचा भराव गेला वाहून. वाहतुकीला अडथळा नाही, मात्र भराव वाहून गेल्याने साईड पट्टीला तडा.