ABP Majha Headlines : 03 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 03 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदारांनी बजावला हक्क, दिंडोरीत सर्वाधिक ३३.२५ टक्के मतदान, मात्र ८ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी 
पवई हिरानंदानी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबलं, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी
ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरींंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल...त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगरमध्ये बजावला हक्क 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब केलं मतदान...मुंबई महानगर परिसरातल्या सर्वच्या सर्व दहा जागा जिंकण्याचा शिंदेंनी व्यक्त केला विश्वास...
मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान सुरू,
३ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, राहुल शेवाळे, संजय दिना पाटील, रविंद्र वायकर, भूषण पाटील यांचं मतदान
मुंबईतील वर्सोव्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, मतदारांना मदत करणं गुन्हा आहे का, भाजप कार्यकर्त्यांचा सवाल
सचिन तेंडुलकर, रेखा, सनी देओल, अमिर खान, कियारा अडवाणी, रणवीर, दीपिका, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टीचं मतदान...तर दोन तास रांगेत उभं रहावं लागल्याने अभिनेत्री भाग्यश्रीचा संताप...
ठाण्यात विचारे आणि म्हस्के आमनेसामने तर मुख्यमंत्र्यांचं कुटुंबासोबत मतदान, पालघरमध्ये हेमंत सावरा आणि भारती कामडी यांनी बजावला अधिकार
नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं मतदान, तर दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनीही केलं मतदान
मतदानापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन, राहुल गांधी रायबरेलीतील हनुमान मंदिरात, तर मुंबईत   उज्ज्वल निकम, अनिल देसाई देवाचरणी लीन
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज देशभरात एकूण ४९ जागांवर मतदान, रायबरेलीत राहुल गांधी तर अमेठीत स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला, तर राजनाथ सिंह यांचंही भवितव्य ईव्हीएममध्य कैद होणार
बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram