ABP Majha Headlines : 03 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नाशिक जिल्ह्यात आज तीन मोठ्या नेत्यांच्या सभा, पंतप्रधान मोदींची दिंडोरीत सभा, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारही नाशिकमध्ये प्रचार करणार, कांदाप्रश्न केंद्रस्थानी असणार का याकडे लक्ष
पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार
मुंबईतील मतं आकर्षित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडू तीन मंत्र्यांवर, शंभूराज देेसाई, उदय सामंत आणि दीपक केसरकरांना तातडीनं कामाला लागण्याचे आदेश
भाडपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, १७ मे रोजी होणाऱ्या मोदी-राज संयुक्त सभेबद्दल खलबतं
पंतप्रधान मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण, यापुढे काळजी घेऊ म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
घाटकोपरच्या अपघातस्थळी होर्डिंग हटवण्याचं काम सुरूच, होर्डिंगचं वजन प्रचंड असल्यानं अडचणी, एका कारमध्ये पुरुष आणि महिला अडकल्याची भीती
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगांव पासून फाऊन्टन हॅाटेलपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी, गायमुखला काल रात्री गर्डर नेणारा ट्रेलर उलटल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा