ABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता

अमरावती, भिवंडी, संभाजीनगरसह १७ शहरांत एनआयएचे छापे, अमरावतीच्या छायानगर आणि भिवंडीच्या खोणी खाडीपारमधून दोघेजण ताब्यात, दोन्ही तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती

परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, ३०० ते २५० जणांवर गुन्हे, आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती, सभागृहात विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट, पंतप्रधानांना दिली अश्वारुढ शिवरायांची प्रतिमा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संसद भवनात घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारही होते उपस्थित

राजकारणात टीका-टिप्पणीच नाही तर त्यापलिकडचेही संबंध असतात, शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल, भाजपचे २० शिंदेचे १२ तर अजित पवारांचे होणार १० मंत्री.. नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता...कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram