ABP Majha Headlines : 03 PM : 07 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिव मतदारसंघातील पाटसांगवीत मतदान केंद्राजवळ हत्या झाल्यानं खळबळ, दोन गटात राडा झाल्यावर चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्य़ांमध्ये राडा, सातपुते मतदारांवर प्रभाव पाडत असल्याचा काँग्रेसचा आरोप
रायगडच्या पेण तालुक्यातल्या सहा गावांचा मतदानावर बहिष्कार, तब्बल १० हजार मतांचा फरक पडण्याची शक्यता
कोल्हापूरच्या खिद्रापूरमधील पुलाच्या भूसंपादावर १० तारखेला निर्णय होण्याची शक्यता, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, ग्रामस्थांनी दिला होता मतदानावर बहिष्काराचा इशारा
राज्यातील ११ मतदासंघात मतदान सुरू, दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.६६ टक्के मतदान
बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट, काकू आवर्जून मतदान करायला आल्या म्हणून भेट घेतली, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता नाना गवळींना आमदार दत्ता भरणेंची शिवीगाळ, सुप्रिया सुळेंनी घेतली नाना गवळींची भेट
शिवीगाळप्रकरणी दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी व्यक्त, तर सुप्रिया सुळेंनी केलेल्या तक्रारीला कायदेशीर उत्तर देईन, भरणेची स्पष्टोक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये दाखल, सुजय विखे आणि सदाशिव लोखेंडेंसाठी सभा घेणार, नंतर अंबाजोगाईला जाणार
पंतप्रधान मोदींची मुंबईत १५ मे रोजी पहिली जाहीर सभा, १७ मे रोजी रोड शो करणार