ABP Majha Headlines : 03 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमताने अनुमोदन, राज्यघटनेला वंदन करत पंतप्रधान मोदींचं इंडिया आघाडीला कृतीतून उत्तर.

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख, थोर नेत्यांच्या परंपरेत बाळासाहेब असल्याचं नमूद 

एनडीए हा भारताचा आत्मा, पुढील १० वर्षे देशात एनडीए सरकार, पंतप्रधान मोदींचा विश्वास, तर ईव्हीएमवरुन विरोधकांनाही चिमटे, काँग्रेसला टोले

आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीशकुमार यांचं आश्वासन

शिवसेना भाजप फेविकॉलचा जोड, तुटणार नाही, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला मुख्यमंत्री शिंदेंचं अनुमोदन, अजित पवार यांच्याकडूनही समर्थन

नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, भाजप नेते प्रल्हाद 
जोशी यांची संसदीय पक्षाच्या बैठकीत घोषणा

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती, चंद्राबाबूंच्या पक्षाला चार तर जे़डीयूला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, ९ जूनला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता 
((मोदी कॅबिनेटचा फॉर्म्युला 'माझा'च्या हाती))

संभाव्य राजीनाम्याच्या मुद्द्यावर फडणवीस आज अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता, राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस ठाम असल्याची माहिती

लोकसभा निकालांनंतर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, एबीपी माझाला ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती

आमदार फुटू नयेत म्हणून ठाकरे गटाकडून आमदार संपर्कात असल्याची वक्तव्ये, संजय शिरसाट यांचा दावा

बेलापूरमध्ये ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, शिक्षक पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीत, आशाकाकींचे आशीर्वाद घेतल्याची माहिती तर महाविकास आघाडीत विधानसभेची चर्चा सुरु झाल्याचं वक्तव्य

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंची माघार, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा

जळगाव जिल्ह्यातल्या तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा दूतावासाशी संपर्क, पालकांना सहकार्य करण्याचं आवाहन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram