ABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.
कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य
((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत))
मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, महामुंबईच्या महामुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष...आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचा कडक बंदोबस्त
((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी))
दिल्लीत आम आदमी पक्षाचं आंदोलन सुरु. अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
पुणे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, जमावानं बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं
मान्सून आज अंदमानात दाखल होणार तर दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल. ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज
((मान्सून आज अंदमानात धडकणार))