ABP Majha Headlines : 02 PM : 15 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा, दोन दिवसात राजीनामा देणार, विधीमंडळ पक्ष नवा मुख्यमंत्री निवडेल अशीही घोषणा...

फेब्रुवारी 2025मध्ये दिल्लीच्या निवडणुका नियोजित, तरीही महाराष्ट्रासोबत दिल्लीच्याही निवडणुका घेण्याचं केजरीवालांचं आव्हान

मुख्यमंत्रीपदाचं मला स्वप्न पडत नाही, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य..

बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, काही लोकांना सत्तेचा माज चढलाय अशीही टीका...

विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया

नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावितांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात...

मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव,१२ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात करणार...

लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी सहा वाजल्यापासून बंद, तसेच मूखदर्शनाची रांग उद्या रात्री १२ नंतर बंद, तर पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram