ABP Majha Headlines : 02 PM : 09 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 02 PM : 09 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी, पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याचा पुनरुच्चार
काही जण भाजपसोबत जाण्यास उत्सुक होते, पण तसा निर्णय झाला नव्हता, अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण तर सरसकट प्रादेशिक पक्ष विलीन होणार नसल्याचीही स्पष्टोक्ती
आदित्य ठाकरेंच्या कपाळी मेरा बाप गद्दार लिहायला हवं, प्रियंका चतुर्वेंदीच्या वक्तव्यावर शिवसेना नेेते संजय निरुपम यांचं प्रत्युत्तर
मनसेला शिवाजी पार्कवर सभेसाठी पालिकेकडून परवानगी....१७ तारखेला शिवाजीपार्कवर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर...
ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात १९९३च्या स्फोटातील आरोपी इक्बाल मुसा, भाजपचा आरोप, उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याचीही मागणी तर आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, कीर्तिकरांचं स्पष्टीकरण
भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, सुहास कांदेंची मागणी, भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा केला आरोप
नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, २०१४ मधील गुन्ह्याप्रकरणी कारवाई, लोकसभेच्या धामधुमीत ठाकरेंना धक्का