ABP Majha Headlines : 02 PM : 09 Jully 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तिसऱ्या आघाडीचा निर्णय, बच्चू कडूंचा इशारा
राधेश्याम मोपलवारांच्या नावावर ३ हजार कोटींची मालमत्ता,रोहित पवारांचा गंभीर आरोप, समृद्धी महामार्गानं कुणाची समृद्धी झाली असा मुख्यमंत्र्यांना सवाला...
कँटोनमेंट बोर्डाच्या जमिनी आता नगरपालिकांकडं, अहमदनगर,संभाजीनगर,देवळाली,कामठी,खडकी,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या भागात चालणार सरकारचं राज्य..
मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव मुख्यमंत्री मांडणार, करी रोड,मरीन लाइन्स,कॉटन ग्रीन, चर्नी रोड अशी इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं येणार..
मोदी-अमित शाहांमुळंच जवानांवर शहीद होण्याची वेळ, संजय राऊतांची टीका, मुंबईत हिट अँड रन करुन पळालेला मिहीर शहा सुरतमध्ये आहे की गुवाहटीमध्ये असा सवाल..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विधान
परिषद निवडणुकीआधी एकोपा...अजित पवारांनी आमदारांसह घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन.....
जरांगे पाटलांची शांतता रॅली आज लातूरमध्ये, हिंगोली,परभणी,नांदेडमधल्या प्रतिसादानं मराठा आंदोलनाची धार तीव्र होणार,सगेसोयरेच्या अध्यादेशासाठीची मुदत चार दिवसांवर..
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर... पहिल्या, दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना सरकारचं निमंत्रण
मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे आजपासून पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत, दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश...
पुण्यात सहायक जिल्हाधिकारी पदावर रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली, अँटी चेंबरवर ताबा घेऊन, ऑडी कारमध्ये येत होती ऑफिसला..
वरळी हिट अॅड रन प्रकरणात आरोपी मिहिरला पळून जाण्याचा वडील राजेश शहाचा सल्ला..तर मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव... पोलीस तपासात माहिती समोर
नागपूरमध्ये २४ तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या तीन घटना... गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू.... तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं, भरधाव बसने वृद्ध सायकलस्वाराला उडवलं
महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण, सदस्य सचिवपद स्वीकारण्यास तहसीलदार, नायब तहसीलदारांचा नकार, मनुष्यबळाच्या अभावाचं कारण
...