ABP Majha Headlines : 01 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची ४० केंद्रावरील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, १८ लाखांचं शुल्कही भरलं...

मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या... शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना...तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या

बिहारमधील 65 टक्के आरक्षणाचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द...नितीशकुमार सरकारला मोठा धक्का...50 टक्क्यांवरून 65 टक्के केलं होतं आरक्षण...

राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना, संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही हजेरी लावणार तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार 

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी, सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत

अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर, अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली... मिटकरींनी कदमांना सुनावले बोल

पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ

तलाठ्यापासून नीटपर्यंत सर्वच परीक्षांत घोळ, एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, गृहमंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत?, फडणवीसांना सवाल

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram