ABP Majha Headlines : 01 PM : 17 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

उत्तर-पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा आरोप, रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मविआकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवणार.

पुण्यातील विधानसभांच्या मविआत रस्सीखेच होण्याची शक्यता, शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातील ६ जागांवर दावा.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन 'मॅक्झिमम विदर्भ',  भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती

सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही, लक्ष्मण हाकेंचा आरोप, उपोषण थांबवणार नसल्याचंही स्पष्टीकरण

छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक, भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा अपेक्षित 

१९  आणि २० जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर,  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळयात राज ठाकरे सहभागी होणार, वारकऱ्यांशीही संवाद साधणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram